सेंद्रिय शेतीच का करायची! रासायनिक का नको ह्याबद्दलची कारणे?

5
(1)

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियापध्दती अनेक मुलतत्त्वांवर व कल्पनांवर आधारित आहे. पुरेश प्रमाणात उच्च पौष्टिक दर्जा असलेले खाद्यान्न उत्पन्न करणे.निसर्गाची निश्चित प्रणाली व कालचक्र आपल्या क्रियांनी अधिक संपन्न होईल असे विधायक कार्य करणे.शेतीतील सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राणीजात यांचा जीवचक्राची वाढ होण्यास प्रयत्नशील असणे.

जमीनीची सुपीकता वाढवून सुक्ष्मजीव व प्राणीजात याचा निर्वाह / प्रतिपाळ करणे.पाण्याचा योग्य वापर व जलाचरांचे संवर्धन करणे.भूमी व जल यांचे संरक्षण करणे.शक्यतो ज्याचे नुतनीकरण होऊ शकेल असे शेतीतील घटक व उपलब्ध स्थानिक आवश्यक घटकांचा आधार घेवुन सेंद्रिय शेतीची जुळणी करणे.

सेंद्रिय पदार्थ व पोषक द्रव्ये यांचे शेतीतील नियमन करतांना शक्यतो सेंद्रिय शेतातीलच किवा स्थानिक सेंद्रिय पदार्थाचा उपयोगाने एकत्रित मिळतील अशी व्यवस्था करणॆ.

सेंद्रिय शेतीत प्रयुक्त होणारा कच्चामाल आदी पुन: वापर किवा नुतनीकरण करता येण्याजोगा असावा.सर्व पाळीव प्राण्यांचे नैसर्गिक व्यवहार कायम राहील अशी परिस्थिती असावी. शेती पध्दतीतून निर्माण होणारे सर्व प्रकारचे प्रदुषण कमी होईल याची काळजी घ्यावी.

 • जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.
 • पाण्याची ५० % बचत होते.
 • सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते.
 • जमिनीची सुपीकता वाढते पोत सुधरतो़.
 • हवेतील ओलावा ओढून घेते नत्र उपलब्ध होते.
 • प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा वेग वाढतो.
 • सजिवता वाढते पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते
 • जमिनीत संजिवकांची निर्मिती होते.
 • जमिनीत नविन घडण होते.
 • पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
 • स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
 • आंतरकाष्टांगजन्य विघटन होऊन मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
 • सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते.
 • जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
 • कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
 • एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो.
 • जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
 • मातीची धूप थांबून पाणी जिरते.
 • आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
 • आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
 • जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
 • पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
 • पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते.
 • पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.
 • बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते.
 • उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
 • जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
 • जलधारणाशक्ती वाढते.
 • जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
 • खारे पाणी सुसह्य होते. फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
 • जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते. जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते. जमिनीत शक्ती संतुलन बनते.
 • जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
 • वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते. पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो.
 • हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते.
 • जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते, जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
 • जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो, जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते.
 • जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते.सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते. हे वाचून तरी शेतकरी जागा होईल.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment