शेतकऱ्यांना दिलासा – परतीचा मॉन्सून महाराष्ट्रातून लवकरच माघार घेणार.

Spread the love

पुणे-: पावसाने दिलेली उघडीप आणि हवेतील ओलावा कमी झाल्याने मॉन्सूनने वेगाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातही परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक हवामान होत असल्याने महाराष्ट्रातूनही लवकरच माघार घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले.

माघारी मॉन्सूनचा दहा दिवसांपूर्वी प्रवास वेगाने सुरू केला आहे. मंगळवारी (ता. ६) संपूर्ण राजस्थान, उत्तरप्रदेशच्या बहुतांशी भाग, मध्य प्रदेश व गुजरातच्या अनेक भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यातच हा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे स्थिती आहे. येत्या उद्या (शुक्रवार) पर्यत हवेचे दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने ओडिसा, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह पूर्व आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यातही विविध भागात पाऊस पडणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे.  

परतीच्या मॉन्सूनला वेगाने माघारी जाण्यासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यातील वातावरणात बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ढगाळ हवामान आहे. तर उत्तर भारतात पावसाची उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे ४०.७ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. अनेक भागात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. तर हरियाणातील कर्नाल येथे १७.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंदविले गेले.

source – agrowan

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *