नाशिकमध्ये वांग्यांना प्रति क्विंटलला सरासरी १७०० रुपये भाव

4.5
(101)

नाशिक : पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.२६) वांग्यांची आवक १५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २५०० दर मिळाला. लॉकडाऊन मुळे बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण आहे. सध्या सर्वच भाज्यांच्या दरात सुधारणा कायम आहे. फ्लॉवरची आवक ४५४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १६४० दर मिळाला. त्यास सरासरी दर १० राहिला. कोबीची आवक ६५१ क्विंटल झाली. तिला ४१५ ते १०८० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये राहिले. ढोबळी मिरचीची आवक ११७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते २७५० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर २००० राहिला. 

कांद्याची आवक १६४६ क्विंटल झाली. त्यास ४२० ते १२०० रुपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ९५० राहिला. बटाट्याची आवक ११६९ क्विंटल झाली. तिला ६०० ते १६०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११०० राहिला. लसणाची आवक ११ क्विंटल झाली. तिला ४००० ते ७५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६२०० रुपये राहिला. 

भोपळ्याची आवक ७२६ क्विंटल होती. त्यास ४६० ते १३३० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९३० राहिला. कारल्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास १६६० ते २९१५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० राहिला. 

दोडक्याची आवक १०१ क्विंटल झाली. त्यास १६६० ते ३३३० रुपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर २५०० राहिला. गिलक्याची आवक ४३ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १६६० राहिला. काकडीची आवक १०७४ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. 

डाळिंबाच्या आरक्ता वाणास ३०० ते ६००० रुपये, फळांमध्ये डाळिंबाची आवक अवघी ३४४ क्विंटल झाली. आरक्ता वाणास ३०० ते ६००० दर होता. सर्वसाधारण दर ३५०० राहिला. तर मृदुला वाणास ४०० ते ८५०० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. संत्र्यांची आवक ३०० क्विंटल झाली.

केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला १००० ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला.

लॉकडाऊन असल्या कारणाने भाज्यांची आवक कमी होतेय त्यामुळे भाज्यांचे भाव वाढलेत असं सर्व साधारण जनतेचे म्हणणे आहे

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4.5 / 5. Vote count: 101

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment