टाकरखेड गाव कारले पिकासाठी प्रसिद्ध? चर्चा तर होणारच!

5
(320)

आज आपण चर्चा करणार आहोत अश्या एका गावाची जे प्रसिद्ध आहे कारले पिकासाठी. महारष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव हे कारले पिकासाठी प्रसिद्ध झाले आहे. या गावाने परिसरातील जिल्ह्यांसह हैदराबादच्या बाजारपेठेपर्यंत इथल्या कारल्याने ओळख तयार केली आहे. येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न व अभ्यासपूर्वक हे पीक यशस्वी करीत त्यातून गावचे अर्थकारण उंचावण्यात यश मिळवले आहे व गावाचे नाव मोठ केलय.

औरंगाबाद महामार्गावर उंद्री गावापासून पाच किलोमीटरवर अडीच हजार लोकसंख्येचे टाकरखेड हेलगा (जि.. बुलडाणा) गाव आहे. 25 वर्षांपूर्वी गावात कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद अशी पारंपरिक पिके घेतली जायची. पुढे सोयाबीन, तूर या पिकांकडे शेतकरी वळले. सन १९९० नंतर नैसर्गिक बदलांचे फटके बसू लागले. पण शेतकऱ्यांनी सुसंगत शेती पद्धतीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

गावातील तरुणांचा यात पुढाकार होता. डाळिंब व त्यानंतर प्रामुख्याने अल्पभूधारकांनी कारले, दोडके, भाजीपाला, पपई आदींना पसंती दिली. त्यात जम बसू लागला. तंत्र आत्मसात झाले. मग गावचे अर्थकारणच बदलू लागले. आजमितीला दरवर्षी १५० एकरांपर्यंत कारले लागवडीचा पल्ला गावाने गाठला आहे.


खालील बाजारपेठेत प्रसिद्ध

टाकरखेडची कारली अकोला, अमरावती, जळगाव खानदेश, हैदराबाद, नाशिक येथील बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. दोन वर्षांत तैवान पपई, केळी वाढत आहे. दिल्ली मार्केटपर्यंत पपई जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कारले घेणारे गाव म्हणून टाकरखेडची ओळख झाली आहे.

विशेष म्हणजे या गावातील तरुण पिढी ने हे सर्व करून दाखवलंय


नवी पिढी शेतीबाबत फार गंभीर नाही, त्यांचा कल व्यवसाय, नोकरीकडे आहे हा समज गावाने चुकीचा ठरवला आहे. गावात दीडशेपर्यंत युवा शेतकरी कारले, दोडके आदी वेलवर्गीय पिकांच्या शेतीत गुंतले आहेत. एकरी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न ते त्यातून मिळवतात. स्वबळावर वेगळे काही करण्याची त्यांची धडपड आहे.

कारले पिकासाठी कसे केले व्यवस्थापन

  • लागवड दरवर्षी एप्रिलच्या दरम्यान सुरू होते. एक एकरात सरासरी एक हजार वेल उभे राहतात. एकरी पाच ते सहा ट्रॉली शेणखत, त्यानंतर नांगरणी, वखरणी व गादीवाफे (बेड) तयार केले जातात.
  • एकरी सुमारे हजार बांबू व त्यापासून मांडव व त्यावर वेल वाढवले जातात. असा केल्याने कारल्याची प्रत वाढते व नुकसान कमी होते
  • लागवडीपासून एक महिन्यानंतर छाटणी करून वेलाची बांधणी होते जेणे करून कारली जमिनीला लागणार नाही व बुरशी पासून स्वरक्षण होईल.
  • जूनमध्ये पहिला पाऊस आला की इकडे तोडणी येते. पहिल्या तोडणीत एकरी चार क्विंटलपर्यंत माल निघतो. दर चार-पाच दिवसांनी तोडणी होते. प्रत्येक तोडा एक क्विंटलने वाढत जाते. एकूण २० ते २५ तोडे होतात. एकरी १२, १५ ते २० टनांपर्यंतही उत्पादन मिळते. त्यासाठी उत्पादन खर्च
  • ८५ ते ९० हजार रुपये असतो. शिवाय काही वर्षांसाठी दीर्घ भांडवली खर्च बांबू ४० हजार,
  • तार १० हजार असा किमान ५० हजारांपर्यंत असतो.

अमरावती, पुणे, हैदराबाद, नाशिक बाजारपेठेत फेमस


शेतकरी प्रतवारी, पॅकिंगवरही भर देतात. २५ ते ३० किलो वजनाच्या प्लॅस्टिक बॅग्जमधून कारली पाठवली जातात. आज टाकरखेडची कारली अमरावती, पुणे, हैदराबाद आणि मागील वर्षीपासून नाशिक बाजारपेठेत हुकूमत गाजवीत आहेत. काही व्यापारी थेट गावातून खरेदी करू लागले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात हा अनुभव पाहण्यात आला. शिवाय तीन-चार तरुणांनी एकत्र येऊन एका वाहनाद्वारे माल बाजारात नेण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. स्वतः ‘मार्केटिंग’ केल्यास किलोमागे दोन- चार रुपये अधिक मिळतात हे त्यांना उमगले आहे.


तोडणी सुरू असतानाच्या म्हणजे जून, जुलै काळात किलोला २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो. श्रावण महिन्यानंतर दर कमी होत जातात. त्याच वेळी बाजारपेठांमध्ये आवक वाढते. वर्षभराचा विचार केल्यास १० ते १५ रुपयांदरम्यान दर शेतकऱ्यांना मिळतात.


कारल्याचा सात ते आठ महिन्यांचा हंगाम जोमात असतो. त्यानंतर सुमारे ७० टक्के कारले उत्पादक त्याच मांडवावर भोपळा, दोडका, काकडी अशी वेलवर्गीय पीक घेतात. दोन वर्षांपासून १५ ते २० शेतकरी पपईकडे वळले आहेत. मागील वर्षी पाच ते सहा शेतकऱ्यांनी केळी लागवडही केली.

पाच कोटी उत्पन्न?

कडू कारले टाकरखेड ग्रामस्थांसाठी मात्र गोड बनले आहे. दहा वर्षांत या पिकातून गावचे अर्थकारण बदलले आहे. दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा कारल्यातून तर भोपळा, दोडका यांच्यापासून दीड- दोन कोटींची उलाढाल गावात होत असावी.

विशेष म्हणजे युवा, काही उच्चशिक्षित व अल्पभूधारक वर्गातील शेतकऱ्यांचे हे यश आहे. एमबीए पदवीधारक अभिजित पाटील यांनी दोन एकरांत पपई लागवड केली आहे. गावशिवारात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. दहा वर्षांत विहिरी, बोअरवेल्सची संख्या बरीच वाढली. तुषार, ठिबक पद्धतीचा वापर होतो.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 320

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment