येत्या पाच ते सहा दिवस राज्याच्या दक्षिण भागात वादळ

5
(2)

पुणे : राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले आहे. काही भागांत उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या पाच ते सहा दिवस राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा ते तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी, कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच झारखंडच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा असून, मध्य प्रदेशचा आग्नेय भाग, उत्तर छत्तीसगड दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशच्या परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे.

उत्तर भारतातील राजस्थानच्या आग्नेय भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. लडाख व परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशच्या आग्नेय भाग व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानातही वाढ होत आहे.  सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश वाढ झाली आहे.

या जिल्ह्यामध्ये पूर्वमोसमीची शक्यता :

सोमवार : कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ.

मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली

बुधवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

गुरुवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *