डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आणि खाते उतारा आता मोबाईलवर

Spread the love

मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी भूमी संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक व ओटीपीद्वारे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आणि खाते उतारा उपलब्ध करुन दिला आहे.राज्यातील ९९ टक्के सातबारा व खाते उतारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात आले आहे असून ते नागरिकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

ई-फेरफार प्रणालीच्या महाभूमी संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लॉगइन सुविधा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे (एनआयसी) यांनी विकसित केले आहे. त्यानुसार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खातेउतारा प्रत्येकी १५ रुपये शुल्क एटीएमकार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, आयएमपीएस किंवा भीम अ‍ॅपद्वारे ऑनलाइन भरुन तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

डिजिटल सातबारा, आठ-अ हवा असल्यास नोंदणी न करता देखील महाभूमी संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक नमूद करुन लॉग इन करता येईल. या पडताळणीसाठी मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी वापरुन तातडीने सातबारा, आठ-अ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वापरकर्त्यांच्या मोबाइल क्रमांकावरुन तयार होणाऱ्या खात्यात भरलेली मात्र, न वापरलेली शिल्लक रक्कम त्याच खात्यावर पूर्वीप्रमाणेच शिल्लक राहणार आहे. त्यामुळे यापुढे मोबाइल क्रमांकावर आपले खाते तयार होईल, त्याद्वारे वापरकर्त्यांला महाभूमी संकेतस्थळाच्या सर्व सुविधा वापरता येणार आहेत.

डिजिटल सातबारा आणि खाते उतारा मिळवण्यासाठी लॉग इन करण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हा दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *