नाशिकच्या संगीता बोरासते यांची द्राक्षाची शेती

Spread the love

नाशिक – ही कथा आहे एका महिला शेतकऱ्याची की ज्यांनी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाना तोंड दिले परंतु कधी हार मानली नाही. नाशिकमधील निफाड तालुक्यात राहणाऱ्या ४६ वर्षीय संगीता बोरासते या द्राक्षाची शेती करतात. मेहनत व आत्मविश्वास यांच्या जोरावर आज संगीता यांनी शेतीमधील सर्व बारीकसारीक गोष्टी शिकून यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. कधी काळी त्यांच्यावर ३० लाखाचे कर्ज होते पण त्याच संगीता आज वर्षाला लाखो कमावत आहेत.

संगीता यांच्या उत्पादित होणाऱ्या द्राक्षापैकी ५० टक्के द्राक्षे विदेशात निर्यात होतात. भारतात देखील त्यांच्या द्राक्षाला भरपूर मागणी आहे. १९९० मध्ये संगीता यांचे लग्न अरुण बोरासते यांच्याबरोबर झाले. त्यानंतर कुटुंबातील वादामुळे कुटुंब विभक्त होऊन संगीता व अरुण यांच्या वाट्याला १० एकर जमीन आली. शेती करण्यासाठी कोणी नसल्याने अरुण यांनी बँकेतील नोकरीं सोडली व शेती करण्यास सुरवात केली.

अरुण यांना देखील शेतीची जास्त माहित नव्हती त्यामुळे अनेक वेळा नुकसान सहन करावे लागले. असेच अनेक वर्षे संगीता व अरुण मेहनत करत राहिले व २०१४ साली त्यांच्या शेतात खूप चांगले पीक आले आता असे वाटतं होते की सगळी संकटे दूर होतील. यावेळेस त्यांना शेतीतून भरपूर उत्पादन निघण्याची आशा होती परंतु काढणीच्या एक दिवस आधी अरुण यांचा मृत्यू झाला. आता मात्र सर्व काही सांगिताला करावे लागणार होते. अरुण यांच्या पाठीमागे संगीता यांच्यावरती ३ मुली व एक मुलगा व ३० लाखाचे घेतलेले कर्ज या सर्व जबाबदाऱ्या होत्या.

शेतात काम करणाऱ्या मजुरांकडून फक्त काम करून घेणे एवढेच सांगिताला माहीत होते. परंतु हळूहळू संगीता सर्वकाही शिकल्या. एक दिवस असाही होता जेव्हा दिवाळीची रात्र होती आणि संगीता रात्रीच्या ९ वाजेपर्यंत शेतात खचलेला ट्रॅक्टर काढत होत्या.

शेती करत असताना संगीता यांनी अनेक संकटांचा सामना केला त्यामध्ये कौटुंबिक प्रश्न असो किंवा मग अवकाळी पडणारा पाऊस, खराब वातावरण असो. द्राक्ष शेतीला पिकवण्यासाठी मी अनेक रात्र जागून काढल्या असल्याचेही संगीता सांगतात.

संगीता यांनी द्राक्षाच्या गुणवत्तेवर भर दिला जेणेकरून एक्स्पोर्ट करताना कुठलाही प्रश्न निर्माण होऊन नये. त्याचमुळे आज संगीता यांचे ५० टक्के द्राक्ष एक्स्पोर्ट विदेशात होते.

संगीता यांनी ३० लाख रुपयांचे असलेले कर्ज फेडले असून आज त्यांना वर्षाला ४० लाख रुपयांची कमाई होते ज्यामध्ये १५ लाख रुपयांचा नफा होतो. संगीता आयष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाना धैर्याने सामोऱ्या गेल्या. न डगमगता न घाबरता त्यांनी कडक मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे.

कोविडच्या काळात त्यांनी द्राक्षाचे नुकसान होऊन नये म्हणून मनुके तयार करून त्याची विक्री केली अशा प्रकारे आज संगीता स्वतःच्या पायावर तर उभ्या राहिल्याचं परंतु स्वतःच्या चार मुलांना देखील त्यांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवले आहे. संगीता यांच्या मेहनतीला व जिद्दीला शेतकरी मिडीयाचा सलाम.

source & image credit to Agriwala

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *