दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये संकटाशी दोन हात करणारे बीड जिल्यातील संदीप गिते

Spread the love

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच यश मिळतेच असे नाही परंतु सातत्याने प्रयत्न केल्यास यशाला नक्कीच गवसणी घालता येते. बीड जिल्यातील पराली तालुक्यातील नंदगौल गावी राहणारे संदीप गिते यांनी पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती असून देखील यश संपादन केले आहे.

संदीप गिते अगोदर सोयाबीन, हरबरा व इतर पिकांची शेती करत असत. परंतु एका प्रशिक्षणा दरम्यान त्यांना जैविक शेती करण्याचे फायदे समजले. यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणहून जैविक शेतीबद्दल माहिती गोळा केली व १ एकर जमिनीवर पपईची लागवड केली.२०१९ मध्ये संदीप यांनी पपईची १००० हजार झाडे लावली. कालांतराने ही झाडे चांगली वाढलीसंदीप सांगतात की जैविक पद्धतीने शेती केल्यास खर्च व पाणी देखील कमी लागते.

अशा पद्धतीने शेती करून संदीप यांनी ७ महिन्यात ३.५ लाख कमावले आहेत. जैविक शेती करण्यासाठी संदीप यांनी १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली व पपईबरोबर त्यांनी कलिंगडाची देखील लागवड केली. सध्या संदीप २० टन पपईची विक्री करत असून राज्यात अनेक ठिकाणी पपईची मागणी होत आहे.

जैविक शेतीपासून मिळणारा फायदा पाहून संदीप यांनी १ एकरवरती करत असलेली शेती २ एकरपर्यन्त वाढवली आहे. संदीप यांचे यश पाहून गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील जैविक शेती करण्यास सुरवात केली असून नवनवीन प्रयोग सुरु केले आहेत.

जानेवारी २०२० मध्ये ८ शेतकऱ्यांपासून सुरु झालेला समुह आज ५० शेतकऱ्यांपर्यन्त पोहचला आहे. हे सर्व शेतकरी फक्त पपईचे शेती करण्यावर थांबले नाहीत तर त्यांनी नवनवीन प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. गावामध्ये १५० एकर जमिनीवर फळांची शेती होत असून त्यातील ४० एकरवरती पपई तर उर्वरित जमिनीवर पेरू, लिंबू व आंबा यासारख्या फळांची देखील लागवड होत आहे.

गावातील इतर शेतकरी संदीप यांच्याप्रमाणे नवीन कृषी पद्धतींचा अवलंब करून स्वतःच्या उत्पादनात वाढ करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिथे अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे संदीप गिते इतर शेतकऱ्यांना नवीन दिशा देण्याचे काम करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *