पुण्यातील पाटस या ठिकाणी राहणारे संदीप विश्राम घोले आधुनिक शेतकरी असून त्यांनी कांद्याची एक नवीन जात शोधून काढली आहे. हलक्या लाल रंगाची ही जात पर्पल ब्लॉच या रोगाला प्रतिकारक असून याची साठवणूक क्षमता जास्त आहे.
३४ वर्षीय संदीप यांनी ग्रेजुइशन पूर्ण झाल्यावर वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यास सुरवात केली. पाटस या ठिकाणी ऊस व कांद्याची शेती नेहमी होते. संदीप यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने नफा जास्त होत नव्हता.
अशातच संदीप २००८ साली दत्ता राव वने या यशस्वी शेतकऱ्याला भेटले व त्यांच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. मातीला सुपीक करण्यासाठी संदीप यांनी मातीत जैविक खते टाकली तसेच आल्टरनेट शेती करण्यास सुरवात केली जेणेकरून मातीचा पोत सुधारेल. त्याचबरोबर त्यांनी स्वतः कांद्याचे बियाणे तयार करण्यास सुरवात केली.
महाराष्टातील अनेक ठिकाणी पिकणाऱ्या कांद्याच्या जातींचा त्यांनी फुरसुंगी या ठिकाणी अभ्यास केला. त्यांनी कांद्याच्या पिकातील अशा झाडांची निवड केली की जे आकाराने मोठे होते पूर्ण १० वर्ष संशोधन करून संदीप यांनी २०१६ साली कांद्याची नवीन जात शोधून काढली या जातींचे परिणाम चांगले दिसून येत होते. यानंतर त्यांनी ही वरायटी नेशनल इनोव्हेशन फौंडेशन या ठिकाणी संशोधनासाठी पाठवली. तेथील संशोधकांनी ही जात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी जाचपडताळणीसाठी पाठवून इतर राज्यात देखील पाठवली.
पूर्ण ३ वर्षांनी नेशनल इनोवेशन फौंडेशन यांनी संदीप यांच्या व्हरायटीला प्रमाणित घोषित करून या जातीला ‘संदीप प्याज’ हे नाव दिले. या जातींचे वैशिष्ट्य म्हणजे हा कांदा लवकर खराब होत नाही, ८-९ महिने आपण या कांद्याला साठवून ठेवू शकतो. त्याचबरोबर या कांद्याचे वजन, आकार इतर कांद्यापेक्षा जास्त आहे. एक एकरमध्ये ४२-४५ टन कांद्याचे उत्पादन निघू शकते.
पाण्याची सोय होण्यासाठी संदीप यांनी शेतात ठिबक व स्प्रिंकलरची व्यवस्था केली आहे. संदीप ८० टक्के जमिनीला जैविक पद्धतीने पिकवत असून २० टक्के जमीन अजून रासायनिक पद्धतीने करत आहेत परंतु पूर्ण जमीन त्यांना जैविक पद्धतीने करण्याची इच्छा आहे.
संदीप यांचे यश पाहून आसपासचे शेतकरी देखील प्रेरित झाले असून संदीप आज व्हाट्स अँपद्वारे ५०० शेतकऱ्यांशी जोडले गेले आहेत. संदीप हे नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात.
आज १२ एकर शेतीपासून संदीप यांना वर्षाला १० लाख रुपयांचा फायदा होत असून संदीप प्याज या जातीचे बियाणे खरेदी करण्यास अनेक शेतकरी त्यांच्याकडे येतात. संदीप यांना कांद्याच्या मार्केटिंगसाठी कुठलाही अडथळा येत नाही.
संदीप सांगतात की चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर मातीला पोषक बनवले पाहिजे, रासायनिक खतांचा वापर पूर्णपने बंद केला पाहिजे जेणेकरून मातीची सुपीकता वाढून जमिनीचा पोत सुधारेल व चांगले उत्पादन निघेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नक्कीच आपला फायदा होईल असेही संदीप सांगतात.संदीप यांना त्यांच्या कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.
संदीप घोले : 9604709751