उमराणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही कांद्याचे लिलाव बंदच

0
(0)

उमराणे : केंद्र शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असतानाच व्यापार्यांवर शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली असुन शासनाने योग्य तोडगा काढुन लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत जवळपास सर्वच कांदा व्यापार्यांकडे शंभर ते दिडशे टन कांदा शेडमध्ये पडुन आहे. त्यामुळे तो माल निकाशी होईपर्यंत व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होणार नसल्याची भुमिका घेतल्याने पुुढील आदेश येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.परंतु अद्यापही काही व्यापार्यांच्या माल निकाशी न झाल्याने शिवाय माल साठवणुक निर्बंध निर्णयावर तोडगा न निघाल्याने आज तिसऱ्या दिवशीही येथील लिलाव ठप्पच आहेत.

परिणामी एकीकडे काही प्रमाणात शिल्लक असलेला उन्हाळी कांदा खराब होत असतानाच कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाकडून निर्यातबंदी, कांदा आयात, प्राप्तीकर विभागाकडून चौकशी, माल साठवणुकीवर निर्बंध आदी अडचणी निर्माण करुन व्यापार्यांसह शेतकर्यांना वेठीस धरत असल्याने व्यापारी व शेतकर्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.

शासनाने योग्य तो तोडगा काढुन बाजार समितीतील लिलाव पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात येत आहे. @ प्रतिक्रिया – गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे चाळीत साठवणुक केलेला कांदा पुर्णतः खराब झाल्याने सद्यस्थितीत अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. व त्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे.त्यामुळे माल विक्री करणे नितांत गरजेचे असताना शासनाने माल साठवणुकीवर निर्बंध लादून व्यापार्यांबरोबर शेतकर्यांनाही वेठीस धरले आहे.

संभाजी देवरे ( शेतकरी ). @ शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने व्यापार्यांकडे आजमितीस शंकर ते दिडशे टन कांदा पडुन आहे. शिवाय जेथे माल पाठवायचा आहे तेथेही माल पडुन असल्याने मागणीत घट आली असुन कांद्याचे बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे शासनाने माल साठवणुकीचे निर्बंध मागे घ्यावेत किंवा किमान शंभर टनापर्यंत मर्यादा वाढवुन द्यावी.

आज माननीय शरद पवार साहेब नासिक दौऱ्यावर आहे. सर्व्याना अपेक्षा आहे कि ते शेतकर्त्यांसी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून काही तरी तोडगा काढतील आणि कांदा लिलाव पुन्हा चालू होतील.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संपर्क नंबर –

नाशिक (पंचवटी) -0253 -2514922

लासलगाव -02550 -266164,266473

विंचूर -02550 -261239

पिंपळगाव बसवंत -02550-253321,251223

सिन्नर -02551-220037

येवला -02559 -265346

उमराणे -02598 -264340

देवळा -02592 -228244

कळवण -02592 -221058

सटाणा -02555 -223062

नामपूर -02555 -224330

चांदवड -02556 -253283

नांदगाव -02552 -242242

मनमाड -02591-222273

दिंडोरी -02557-221017

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment