bhopla

तुम्ही कधी ७ फूट लांबीचा भोपळा बघितला आहे का? पण हे खर आहे.

Spread the love

उत्तर प्रदेश – सीतापूर जिल्यात राहणारे आलोक पांडे अनेक पिकांची शेती एका वेळेस करतात.त्यांच्या शेतात ७ फूट लांबीचे भोपळे देखील आहेत. त्यांची शेतीतील प्रगती बघण्यासाठी इतर जिल्यातील लोकदेखील येतात. आलोक पांडे यांनी ग्रेजुएशनपर्यन्त शिक्षण पूर्ण केले आहे.आलोक आधुनिक पद्धतीने शेती करतात. ज्वारी, गहू याचबरोबर ते भाज्यांची देखील लागवड करतात.

आलोक यांच्याकडे १० एकर शेती आहे. सुरवातीला आलोक यांनी केळ्याची लागवड केली व त्याचबरोबर शिमला मिरचीची देखील लागवड केली.

गुणवत्ता चांगली असल्यामुळे केळीला चांगला भाव मिळाला.त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला.  जर आधुनिक पद्धतीने शेती केली तर २० गुंठे क्षेत्रामधून देखील ५५ – ६० हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.

भोपळ्याबद्दल आलोक सांगतात की भोपळ्याची लांबी वाढविण्यासाठी ते कुठल्याही इंजेक्शनचा वापर करत नाहीत. झाड उगायला लागले की त्यामध्ये ते शेणाचे पाणी करून टाकतात भोपळा २-३ फूटचा झाल्यावर खाता येतो परंतु आलोक यांच्या भोपळ्याची लांबी ६-७ फूटपर्यन्त जाते आणि वजन २० किलोपेक्षाही अधिक असते. कोणत्याही रासायनिक खतांचा व औषंधाचा वापर न करता आलोक यांनी पारंपरिक पद्धतीने भोपळा लागवड केली आहे.

सुरवातीला जेव्हा त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड केली होती तेव्हा भोपळा सर्वसाधारण आला पण त्यातील एक भोपळा मात्र ३ फूट लांबीचा उगवला होता तेव्हा मात्र त्यांनी ३ फूट लांब असणाऱ्या दुधी भोपळ्याचे बीज जपून ठेवले व ते पुढच्या वर्षी पुन्हा लागवडीसाठी वापरले. तेव्हा मात्र सगळे भोपळे ५ फूट लांबीचे उगवले यावेळी देखील त्यांनी ५ फूट लांब असणाऱ्या दुधी भोपळ्याचे बीज जपून ठेवले व पुन्हा त्याची लागवड केली. लागवड केलेल्या या भोपळ्यापासून मात्र ६-७ फूट लांबीचे भोपळे उगवले. परंतु हे यश गाठण्यासाठी आलोक यांना २ वर्ष लागली.

या पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेताभोवती तारांचे कुंपण केले आहे व कॅमेरे देखील लावले आहेत. पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. पाण्याची बचत होण्यासाठी ते मल्चिंग देखील वापरतात. आलोक पांडे यांनी विविध प्रयोग करून हे सिद्ध केले आहे की शेती आपल्याला नुकसान नाही तर भरपूर फायदा मिळवून देऊ शकते फक्त त्याला मेहनत व कष्टाची जोड लागते.

Source – Agriwala

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *