लातूरच्या धनंजय राऊत यांची चंदन व हळद शेती – वर्षाला कमावताय इतके करोड रुपये.

Spread the love

महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी राहणारे धनंजय राऊत नेहमीच शेतीमध्ये काहीतरी वेगळे करत असत. त्यांचे वडील व इतर शेतकरी हे मात्र पारंपरिक शेती करत होते. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी धनंजय यांनी कृषी विभागामधून पॉलीहाऊस फार्मिंगबद्दल प्रशिक्षण देखील घेतले होते.

लातूरमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे त्यांना हाईटेक शेती करण्याची इच्छा होती. प्रशिक्षण घेत असताना त्यांना एका मित्राने चंदनाची शेती करण्याचा सल्ला दिला तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देखील कमी पाण्यात चंदन लागवड करण्यास सांगितले.

सुरवातीला धनंजय चंदन शेती कशी करावी याबाबत विचारात पडले. प्रशिक्षण करताना ज्या मित्राने त्यांना चंदन लागवड करण्याचा सल्ला दिला होता त्या मित्राकडे गेले व त्यांच्या वडिलांची चंदनाची शेती पहिली.

चंदनाची झाडे एवढ्या मोठया किमतीत विकली जातात हे पाहून धनंजय यांनी देखील एक एकर जमिनीवर २०० झाडे चंदनाची लावली. चंदनाची लागवड केल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले.

चंदनाची वाढती मागणी बघून धनंजय यांनी १० एकर वरती ३००० चंदनाची झाडे लावली. वर्षाला त्यांची ६ लाख झाडे तयार होतात. १-२ वर्षाचे झाड १० रुपयात तर ४-५ वर्षाचे झाड ४०-५० रुपयात विकले जाते.

image credit to Agriwala

महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी राहणारे धनंजय राऊत नेहमीच शेतीमध्ये काहीतरी वेगळे करत असत. त्यांचे वडील व इतर शेतकरी हे पारंपरिक शेती करत होते. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी धनंजय यांनी कृषी विभागामधून पॉलीहाऊस फार्मिंग बद्दल प्रशिक्षण देखील घेतले होते.

लातूरमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे त्यांना हाई टेक शेती करण्याची इच्छा होती. प्रशिक्षण घेत असताना त्यांना एका मित्राने चंदनाची शेती करण्याचा सल्ला दिला तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देखील कमी पाण्यात चंदन लागवड करण्यास सांगितले.

सुरवातीला धनंजय चंदन शेती कशी करावी याबाबत विचारात पडले व प्रशिक्षण करताना ज्या मित्राने त्यांना चंदन लागवड करण्याचा सल्ला दिला होता त्याच्या घरी गेले व त्यांच्या वडिलांची चंदनाची शेती पहिली.

चंदनाची झाडे एवढ्या मोठया किमतीत विकली जातात हे पाहून धनंजय यांनी देखील एक एकर जमिनीवर २०० झाडे चंदनाची लावली. चंदनाची लागवड केल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले.

चंदनाची वाढती मागणी बघून धनंजय यांनी १० एकर वरती ३००० चंदनाची झाडे लावून त्यांनी स्वतःची नर्सरी चालू केली. वर्षाला त्यांची ६ लाख झाडे तयार होतात. १-२ वर्षाचे झाड १० रुपयात तर ४-५ वर्षाचे झाड ४०-५० रुपयात विकले जाते.

धनंजय यांनी चंदन लागवडीबरोबर इतर पिकांची देखील लागवड केली. हिमाचल प्रदेशचा दौरा केला असताना धनंजय यांनी काळ्या हळदीची लागवड पहिली व स्वतःच्या शेतात देखील ८-१० हळदीची झाडे लावली. काळ्या हळदीची मागणी बघता त्यांनी एक एकरवरती हळदीची लागवड केली.

धनंजय काळी हळद अगोदर १००० रुपये किलो विकत असायचे परंतु मागणी वाढल्यामुळे त्यांनी १५०० रुपये किलो केली.यावर्षी तर धनंजय यांनी ५००० रुपये किलो या दराने देखील हळद विकली आहे. चंदन व काळी हळद हे असे दोन पिके आहेत की ज्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर दुप्पट उत्पन्न निघू शकते.

धनंजय यांना चंदन व इतर पिकांपासून वर्षाला १ करोड रुपयांची कमाई होते. एका हंगामात तर फक्त हळदीपासून १० लाख रुपयांची कमाई होत असल्याचे धनंजय सांगतात. जवळपास १४ राज्यांमध्ये धनंजय यांचे चंदन विक्री होते. योग्य मार्गदर्शन व कष्ट करण्याची ताकद असेल तर नक्कीच यशाचे शिखर गाठता येईल हे धनंजय यांनी सिद्ध केले आहे.

source -Agriwala

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *