पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत – पालकमंत्री अजित दादा पवार

Spread the love

पुणे – परतीचा पाऊस, वादळीवारा आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री अजित पवार यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला असून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोलापूर, पंढरपूर, बारामती या चार ठिकाणी एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या असल्याचे ही पालकमंत्री पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिवृष्टी, पूरस्थितीच आढावा घेतला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, ॲड. राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. घरे, मालमत्तांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *