जैविक (हळद) शेतीद्वारे वर्षाला लाखो कमावणारे गुजरातचे चिंतन शाह

Spread the love

आज असे अनेक लोक आहेत ज्यांनी नोकरी सोडून शेती करण्यास सुरवात केली आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कथा पाहणार आहोत ज्यांनी नोकरी सोडून जैविक शेती करण्यास सुरवात केली आहे.

गुजरातमधील देवपूरा गावातील चिंतन शाह यांनी २०१५ मध्ये १० एकर जमीन खरेदी केली व २०२० पर्यन्त त्यांनी या जमिनीला उपजाऊ तर बनवलेच परंतु आज या जमिनीवर गहू, आले व हळदीची शेती होत आहे.

गुजरातमधील हा भाग तंबाकू पिकवण्यासाठी ओळखला जातो परंतु चिंतन यांनी वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. २०११ मध्ये चिंतन हे एमबीएची पदवी संपादन करून घरच्या टेक्स्टटाईल व्यवसायात सहभागी झाले परंतु एका वेळेनंतर त्यांनी शेती करण्याचे ठरवले.

चिंतन यांचे छोटे भाऊ नेदरलँडमध्ये शेती करत. चिंतन यांनी आपल्या भावाची मदत घेण्याचे ठरवून जैविक शेती करण्यास सुरवात केली आहे. भावाच्या मदतीने चिंतन यांनी जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संपर्क साधला व जैविक शेतीबद्दल सर्व काही जाणून घेतले.

एका वर्षातच चिंतन यांनी ७.५ एकर जमीन ही उपजाऊ बनवली कारण त्या जमिनीवर भरपूर प्रमाणात मोठे खड्डे होते. मातीची सुपीकता वाढविण्यासाठी चिंतन यांनी मातीमध्ये शेण, जैविक खत व जीवामृतचा देखील भरपूर उपयोग केला आहे.

सुरवातीला त्यांनी हिरव्या भाज्या, बाजरी व हळ्द या पिकांची लागवड केली परंतु यश आले नाही. चिंतन यांच्या क्षेत्रात तंबाकू, भाज्या, तांदूळ यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर चिंतन यांनी गहू व आल्याची लागवड करण्याचे ठरवले परंतु जैविक शेतीबद्दल अनुभव नसल्याने चिंतन यांना अनेक वेळा आर्थिक नुकसान सहन करावे लागले. २०१९ पर्यंत चिंतन यांनी १ टन हळ्द, ३०० किलो आले व २.५ टन गव्हाचे उत्पादन काढले आहे.

आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी चिंतन यांनी ग्राहकांना हळ्द व आल्याचे मोफत सॅम्पल वाटले आहेत. ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेण्याबरोबरच चिंतन यांनी ‘राधे कृष्णा फार्म’ या नावाने आपला ब्रँड बनवला आहे. चिंतन यांनी आपल्या हळदीची विक्री अनेक मोठ्या शहरांत केली आहे. या उद्योगातून चिंतन वर्षाला ७ लाख रुपयांचा नफा कमावतात.

चिंतन यांना आणखी आपल्या शेतीत सुधारणा करायची असून मातीची सुपीकता देखील वाढवायची आहे. पाच क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन चिंतन यांनी हळ्द लागवडीला सुरवात केली होती आणि आज ते यामध्ये यशस्वी देखील झाले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *