नाशिक – सध्या बाजारात कांद्याला सरासरी मिळत असलेला बाजारभाव आणि शेतकरयांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी देत असलेला बाजारभाव यात जमीन- आस्मानिची तफावत होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
एखाद्या शेतकऱ्याला पाच दहा पिशवी कांद्याला जास्तीत जास्त विक्रमी बाजारभाव देऊन इतर शेतकर्यांची लूट होताना दिसत आहे.
एकाच दर्जाच्या (क्वॉलिटी) कांद्याला वेगवेगळा बाजारभाव मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. आज चांगल्या प्रकारच्या कांद्याला सरासरी प्रति किलो 40 ते 45 रूपये बाजारभाव असताना अगदी थोड्याच शेतकर्यांना हा बाजारभाव मिळत असून बाकीच्या इतर शेतकर्यांना 20 ते 30 रूपये प्रति किलोवर बोळवण केली जात आहे. म्हणजेच कांद्याच्या बाजारभावात फार मोठी तफावत पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील काही कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा व्यापारी शेतकर्यांची अडवणूक करताना दिसत आहेत. यातून शेतकर्यांनी अनेक वेळा लिलाव बंद पाडण्याच्या सुध्दा घटना वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी बाजार समितींच्या आशिर्वादाने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.
बघा आजच्या कांदा भावात किती मोठी तफावत आहे.
बाजार समितीचे नाव | शेतमालाचे नाव | किमान भाव | कमाल भाव | सरासरी भाव |
सटाणा | उन्हाळी कांदा | 1000 | 4300 | 2875 |
पिंपळगाव | उन्हाळी कांदा | 1100 | 4200 | 3200 |
लासलगाव | उन्हाळी कांदा | 1000 | 3900 | 2900 |
उमराणा | उन्हाळी कांदा | 1000 | 3900 | 2700 |
चांदवड | उन्हाळी कांदा | 700 | 3952 | 2450 |
येवला | उन्हाळी कांदा | 800 | 3375 | 2800 |
कळवण | उन्हाळी कांदा | 1000 | 4205 | 3400 |
नामपूर | उन्हाळी कांदा | 1000 | 3850 | 2800 |
अभोणा | उन्हाळी कांदा | 1000 | 4765 | 3300 |
वरील मार्केट भाव बघून तुमच्या लक्ष्यात येईल कि व्यापारी शेकऱ्यांची किती लूट करताय . शेतकऱ्यांनो हीच वेळ आहे आवाज उठवायची. तुमचा मेहनतीने कमावलेला कांदा असाच व्यापाऱ्यांच्या घश्यात कमी भावात घालू नका. कांदा विकायची घाई करू नका, लवकरच कांदा शम्भरी गाठेल.
याबाबत आता सरकारला झोप लागली आहे का? निर्यातबंदी करायला सरकारचे लक्ष असते.याचा जाब विचारायला सरकारला आता झोप लागली आहे का?